मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आ. निलेश राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा !


मुंबई : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील शिवसेना भाजपा महायुतीचे कार्यसम्राट आमदार निलेश नारायणराव राणे यांचा 44 वा वाढदिवस सोमवारी पार पडला. यंदा वाढदिवसादिनी विधानासभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने आ. राणे यांनी आदल्या दिवशी वाढदिवस साजरा करत वाढदिनी अधिवेशनाच्या कामकाजात लक्ष घालल्यास प्राधान्य दिले. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी काल विधानभवानात निलेश राणे यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार करत त्यांना खास शुभेच्छा दिल्या. दरम्यान, विधानसभेच्या वतीने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील आ. राणे यांना शुभेच्छा देणारा प्रस्ताव मांडला.

