चिंदर सडेवाडी येथे स्ट्रीटलाईट कामाचा शुभारंभ


मालवण : आचरा मालवण मुख्य रस्ता ते ब्राम्हणदेव मंदिर चिंदर सडेवाडी येथील स्ट्रीटलाईट कामाचा शुभारंभ भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख देवेंद्र हडकर यांच्या हस्ते चिंदर सडेवाडी येथे करण्यात आला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, प्रकाश मेस्त्री, दिपक सुर्वे, मनोज हडकर, दत्ता वराडकर, संजय लोके, गणपत चिंदरकर, प्रफुल फाटक, प्रकाश चिंदरकर, दिगंबर हडकर , निलेश हडकर, पोलिस पाटील हर्षद बेनाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. अनेकवर्ष सडेवाडी ग्रामस्थ स्ट्रीट लाइटच्या प्रतीक्षेत होते. या कामाला सुरुवात होत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

