मालवणची भूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जवळचे नाते !
नौदल दिनाच्या कार्यक्रमात सामील होण्यास उत्सुक ; मालवणात दाखल होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांचे ट्विट
मालवण | कुणाल मांजरेकर
नौदल दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दुपारी मालवण मध्ये दाखल होत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी मालवणची भूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जवळचे नाते असल्याचे म्हटले असून नौदल दिनाच्या कार्यक्रमात सामील होण्यास आपण उत्सुक असल्याचे नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे.
मालवणात येण्यापूर्वी मोदींनी हे ट्विट केले आहे. ” नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलातील सर्व जवानांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या समुद्राचे रक्षण करण्याची त्यांची वचनबद्धता ही त्यांच्या कर्तव्याप्रती असलेल्या अतूट समर्पणाचा आणि आपल्या राष्ट्रावरील प्रेमाचा पुरावा आहे. प्रत्येक परिस्थितीत त्यांचा आत्मा आणि संकल्प अटल राहतो. त्यांच्या सेवा आणि बलिदानाबद्दल आम्ही सोदैव कृतज्ञ आहोत.
मी आज महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे नौदल दिनाच्या कार्यक्रमात सामील होण्यास उत्सुक आहे. या ठिकाणाला छत्रपती शिवाजी महाराजांचे जवळचे नाते आहे, ज्यांचे मजबूत नौदल उभारण्याचे प्रयत्न सर्वश्रुत आहेत.” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.