मालवणात “राणे स्टाईल” मध्ये शिवजयंतीचा उत्साह ; भव्य मोटरसायकल रॅलीने वातावरण “शिवमय”

माजी खा. निलेश राणे यांची उपस्थिती ; कुंभारमाठ ते बंदर जेटीपर्यंत रॅली काढून भाजपचं शक्तीप्रदर्शन

ढोल ताशांचा गजर… अन् शिवरायांच्या जयघोषात वाजत गाजत किल्ले सिंधुदुर्गवर शिवरायांचे पूजन

मालवण | कुणाल मांजरेकर

भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मालवणात आज “राणे स्टाईल” मध्ये प्रचंड उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोरयाचा धोंडा येथे पूजन केल्यानंतर कुंभारमाठ ते बंदर जेटी पर्यंत माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य मोटरसायकल रॅली काढून शिवरायांचा जयघोष करण्यात आला. या रॅलीच्या निमित्ताने भाजपने मोठे शक्तीप्रदर्शन घडवून आणले. रॅलीत युवा वर्गा बरोबरच महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. या रॅलीनंतर बंदर जेटी ते सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरापर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून दरवर्षी ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली जाते. यावर्षीही भारतीय जनता युवा मोर्चाच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. माजी नगरसेवक दीपक पाटकर, युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी वायरी येथील मोरयाचा धोंडा या ठिकाणी पूजन करण्यात आले. यानंतर कुंभारमाठ शिवाजी पुतळा येथे भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुंभारमाठ ते मालवण बंदर जेटी पर्यंत भव्य मोटरसायकल मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत स्वतः निलेश राणे सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत ही रॅली मालवण बंदर जेट्टी पर्यंत काढण्यात आली. येथून ढोल ताशांच्या गजरात सर्व पदाधिकारी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दिशेने रवाना झाले. किल्ल्यावर निलेश राणे यांच्या हस्ते शिवरायांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांच्या विजयासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना साकडे घालण्यात आले.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, आनंद शिरवलकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, सुशांत घाडीगावकर, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर, महेश मांजरेकर, अशोक तोडणकर, राजन गावकर, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, आशिष हडकर, राजू बिडये, अभय कदम, आबा हडकर, महेश सारंग, आप्पा लुडबे, गणेश कुशे, पूजा करलकर, चारुशीला आचरेकर, ममता वराडकर, पूजा सरकारे, पूजा वेरलकर, निषय पालेकर, राकेश सावंत, सनी कुडाळकर, बाबा मोंडकर, अरविंद सावंत, अवी सामंत, मोहन वराडकर, उत्तम पेडणेकर, विजय ढोलम, भाई मांजरेकर, प्रमोद करलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!