… अन्यथा युवासेना २६ जानेवारीला रास्तारोको आंदोलन करणार

मालवण : मालवण- कसाल राज्यमार्ग वरील जरीमरी घाटी येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. बांधकाम विभागाने केलेल्या अर्धवट डागडुजीमुळे वाहतुकीस उडथळा निर्माण होत आहे. तरी या रस्त्याचे कार्पेटीकरण लवकरात लवकर व्हावे. अन्यथा २६ जानेवारी रोजी रास्तारोको करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य कुंभारमाठ तथा शिवसेना युवासेना उपविभागप्रमुख राहुल परब, युवासेना शाखाप्रमुख स्वामीदास शिरोडकर, संजय देऊलकर महिला पदाधिकारी शितल देऊलकर, मुक्ता राजपुत यांच्या माध्यमातून मालवण सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!