मठबुद्रुक ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा ; राजू परुळेकर किंगमेकर
हा विजय भाजपच्या विचारांचा ; आगामी काळात शतप्रतिशत भाजपा हेच लक्ष : परुळेकर
मालवण : तालुक्यातील मठबुद्रुक ग्रामपंचायतीवर माजी उपसभापती राजू परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने झेंडा फडकवला. सरपंच पदी मोहन वेंगुर्लेकर, सदस्य विनायक बाईत, लीना बाईत, उदय सावंत, विद्या मेस्त्री हे विजयी झाले तर तीन सदस्य यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत.
भारतीय जनता पक्ष आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विचारांचा हा विजय आहे. तसेच गावात झालेल्या विकास कामांचा हा विजय आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकसंघ पद्धतीने केलेल्या कामामुळेच भाजपने तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीवर यश मिळवले आहे. आगामी काळातही गावागावात पक्ष संघटना मजबूत करताना पंचायत समिती, जिल्हा परिषद, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शतप्रतिशत भाजपा हेच आपले लक्ष असेल असे श्री. परुळेकर यांनी स्पष्ट केले.