ग्रा. पं. निवडणूक : मालवणात भाजपचे वर्चस्व ; शिवसेना ठाकरे गटाचीही लक्षवेधी झुंज

प्रतिष्ठेच्या वायरी भूतनाथसह वायंगणी ग्रा. पं. शिवसेनेने राखली ; कोळंब, रेवंडीसह आठ ग्रा. पं. भाजपाकडून खेचल्या

शिवसेना ठाकरे गटाची सत्ता असलेल्या कुंभारमाठ, महान, पोईप, किर्लोससह दहा ग्रा. पं. भाजपकडे

देवबाग सरपंच निवडणूकीत गटाचे उल्हास तांडेल एका मताने विजयी

चौके, तारकर्ली, देवली, तोंडवळी सह १० ग्रा. पं. वर गाव पॅनलचे सरपंच

मालवण | कुणाल मांजरेकर

ग्रा. पं. निवडणुकीत मालवण तालूक्यात भाजपने अपेक्षेप्रमाणे वर्चस्व राखले आहे. तालूक्यात सर्वाधिक ग्रा. पं. वर सत्ता मिळवून भाजपा नंबर वनचा पक्ष ठरला आहे. ठाकरे गटाकडे असलेल्या कुंभारमाठ, महान, पोईप, किर्लोससह दहा ग्रा. पं. भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाने देखील तालुक्यात कडवी लढत दिल्याचे दिसून आले. भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या वायरी भूतनाथसह वायंगणी ग्रा. पं. वरील सत्ता शिवसेना ठाकरे गटाने राखतानाच् भाजपकडील आठ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे. तालुक्यात तब्बल १० ग्रा. पं. वर गाव पॅनलची सत्ता आली आहे. यातील काही ग्रा. पं. वर भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटाने आपापले दावे केले आहेत. तालूक्यात देवबाग मध्ये शिंदे गटाचे उल्हास तांडेल अवघ्या एका मताने सरपंच पदी निवडून आले आहेत.

मालवण तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात आली होती. यातील ९ ग्रा. पं. ची सरपंच पदाची निवड बिनविरोध झाली होती. उर्वरित ४६ ग्रा. पं. च्या सरपंच आणि सदस्य पदासाठी निवडणूक रविवारी घेण्यात आली. याची मतमोजणी मंगळवारी येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये करण्यात आली. या निवडणुकीत भाजपने ४६ पैकी २३ ग्रा. पं. च्या सरपंच पदावर विजय मिळवला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने १२ ग्रा. पं. च्या सरपंच पदावर विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपने ठाकरे गटाकडील वायरी भूतनाथ आणि वायंगणी ग्रा. पं. ताब्यात घेण्यासाठी जोरदार व्यूहरचना केली होती. मात्र या दोन्ही ठिकाणी ठाकरे गटाने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे.

या शिवाय भाजपच्या ताब्यातील प्रतिष्ठेच्या कोळंब, रेवंडी, कांदळगाव, बांदिवडे, श्रावण, असरोंडी, बुधवळे – कुडोपी, राठिवडे या आठ ग्रा. पं. शिवसेना ठाकरे गटाकडे आल्या आहेत. भाजपने देखील ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाकडील कुंभारमाठ, वायंगवडे, हेदुळ, किर्लोस, पळसंब, महान, नांदोस, वडाचापाट, पोईप, तिरवडे या दहा ग्रामपंचायती भाजपने खेचून घेतल्या आहेत.

मालवण तालुक्यात दहा ग्रामपंचायतींच्या सरपंच पदावर गाव पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रतिष्ठेच्या चौके ग्रा. पं. वर गाव पॅनलच्या गोपाळ चौकेकर यांनी विजय मिळवला आहे. तर तारकर्ली, तोंडवळी, वराड, नांदरुख, खोटले, चाफेखोल, देवली, असगणी या ग्रा. पं. वर गाव पॅनलची सत्ता आली आहे.

देवबाग मध्ये शिंदे गटाच्या उल्हास तांडेलना नशिबाची साथ ; मनसेही खाते खोलले

मालवण तालुक्यात शिंदे गटाने एका ग्रा. पं. चे सरपंच पद मिळवले आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे देवबाग ग्रा. पं. चे उमेदवार उल्हास तांडेल यांनी अवघ्या एका मताने सरपंच पदावर विजय मिळवला. उल्हास तांडेल यांना ३५५ तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार नादार तुळसकर यांना ३५४ मते मिळाली. याठिकाणी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. तर याच ग्रा. पं. मध्ये मनसेच्या पास्कॉल रॉड्रिक्स यांनी विजय मोठे मताधिक्य घेऊन मिळवला.

मालवण तालुका पक्षीय बलाबल

एकूण ग्रा. पं. ५५
भाजपा – २८
शिवसेना – १३
गाव पॅनल – १३
बाळासाहेबांची शिवसेना – १

मालवण तालुका सरपंच पदाचे विजयी उमेदवार

श्रावण- नम्रता मुद्राळे (289), निरोम- बाबाजी राऊत (229), रामगड- शुभम मटकर (284), मठबुद्रुक- मोहन वेंगुर्लेकर (314), बुधवळे-कुडोपी- संतोष पानवलकर (178), गोठणे- दिप्ती हाटले (253), किर्लोस- साक्षी चव्हाण (293), राठिवडे- दिव्या धुरी (436), त्रिंबक- किशोर त्रिंबककर (418), हिवाळे- रघुनाथ धुरी (367), ओवळीये- रंजना पडवळ (371), असरोंडी- अनंत पोईपकर (415), बांदिवडे बुद्रुक- अनंत मयेकर (283), तोंडवळी- नेहा तोंडवळकर (400), वायंगणी- रूपेश पाटकर (487), कोळंब-सिया धुरी (622), हडी- प्रकाश तोंडवळकर (399), कांदळगाव- रणजित परब (335), महान- अक्षय तावडे (138), रेवंडी- अमोल वस्त (254), मिर्याबांदा- नीलिमा परूळेकर (476), वेरळ- धनजंय परब (272), माळगाव- चैताली साळकर (272), मालोंड- पूर्वा फणसगावकर (247), पोईप- श्रीधर नाईक (444), वडाचापाट- सोनिया प्रभुदेसाई (494), चाफेखोल-राजलता गोसावी (157), नांदरूख- रामचंद्र चव्हाण (157), सुकळवाड- युवराज गरूड (577), नांदोस- माधुरी चव्हाण (397), तिरवडे- रेश्मा गावडे (215), हेदूळ- प्रतिक्षा पांचाळ (299), तळगाव- लता खोत (502), खोटले- सुशील परब (185), वायंगवडे- विशाखा सकपाळ (224), वराड- शलाका रावले (846), वरची गुरामनगरी- शेखर पेणकर (829), धामापूर- मानसी परब (398), आंबेरी- मनमोहन डिचोलकर (437), देवली- शामसुंदर वाक्कर (585), चौके- गोपाळ चौकेकर (327), कुंभारमाठ- पूनम वाटेगावकर (490), देवबाग- उल्हास तांडेल (355), तारकर्ली-काळेथर- मृणाली मयेकर (689), वायरी भुतनाथ- भगवान लुडबे (519)

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!