आदित्य साहेब, तुम्ही उर्वरित महाराष्ट्र बघा, सिंधुदुर्गात पक्ष संघटना वाढवण्यासाठी आम्ही कटीबद्ध …!
उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणाऱ्या आदित्य ठाकरेंना शिवसैनिक शक्तिप्रदर्शन करून देणार विश्वास
मालवण तालुका शिवसेना, युवासेनेकडून आदित्य ठाकरेंचे जल्लोषात स्वागत
शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे : हरी खोबरेकर यांचे आवाहन
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेनिमित्त सोमवारी १ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात कुडाळ येथे मालवण तालुका शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. “आदित्य साहेब तुम्ही उर्वरित महाराष्ट्र बघा, सिंधुदुर्गात पक्ष संघटना वाढवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आमची निष्ठा केवळ आणि केवळ मातोश्री चरणी आहे”, असा संदेश यानिमित्ताने दिला जाणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येथील शिवसेना शाखेत शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक रविवारी घेण्यात आली. यानंतर श्री. खोबरेकर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, जिल्हा युवासेना अधिकारी मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, शहरप्रमुख मंदार ओरसकर, उपतालुकाप्रमुख अमित भोगले, अनंत पाटकर यांच्यासह सर्व उपतालुका प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. शिवसेना आणि महिला आघाडीचे पदाधिकारी देखील आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी उद्या कुडाळ येथे एकवटणार आहेत. राज्यात अनेक ठिकाणचे आमदार खासदार जरी पक्षापासून दूर झाले असले तरी तळागाळातील कार्यकर्ता शिवसेनेसोबत ठाम आहे, हे दाखवून देण्यासाठी आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जिल्ह्यात येणार असून उद्या कुडाळ मध्ये ते शिवसैनिकांशी संवाद साधतील. त्यानंतर सावंतवाडी येथे यांची जाहीर सभा होणार आहे. तरी शिवसेना, युवासेनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हरी खोबरेकर यांनी केले आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवा तालुकाप्रमुख मंदार गावडे, उपतालुकाप्रमुख अमित भोगले, सोमनाथ माळकर, शहरप्रमुख मंदार ओरसकर, राहुल सावंत मीनाक्षी शिंदे, दीपा शिंदे, शिला गिरकर, संमेश परब,आतू फर्नांडिस पंकज सादये, प्रसाद चव्हाण, चंदू खोबरेकर, मोरेश्वर धुरी, बंड्या सरमळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, अक्षय भोसले, संदेश तळगावकर, विशाल सरमळकर, प्रवीण रेवंडकर, भाऊ चव्हाण, जान्हवी खोबरेकर, अमेय देसाई, शशांक माने, गौरव वेर्लेकर, समीर लब्दे, साईप्रसाद साळकर, किशोर कासले, दर्शन महाडगूत, सुरेश मडये, सिद्धेश मांजरेकर, नंदू गवंडी, तपस्वी मयेकर, किरण वाळके, विजय पालव, तेजस लुडबे यांच्यासह अन्य शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.