मालवणच्या दांडी किनारी १३ मे पासून पर्यटन महोत्सव

आमदार वैभव नाईक यांची माहिती

मालवण : मालवण नगरपरिषद, डीपीडिसी, पर्यटन विभाग यांच्या वतीने मालवण दांडी किनारी १३ ते १५ मे दरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. दरम्यान, लवकरच कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर केली जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी दिली आहे.

महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात केला जाणार आहे. विविध कार्यक्रम असणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य काही मंत्री विशेष अतिथी यावेळी उपस्थित राहणार आहेत, असेही आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!