केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या देवबागात ; मच्छिमारांशी साधणार संवाद
कुणाल मांजरेकर
मालवण : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे शुक्रवारी २९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता मालवण तालुक्यातील देवबाग गावाला भेट देणार आहेत. यावेळी ते मच्छिमारांशी संवाद साधणार असून अन्य विविध विषयांवर देखील चर्चा करणार आहेत. ना. राणे देवबाग चर्च समोर सिमाव रापण संघाला भेट देणार आहेत. तरी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.