होमपीचवर माणगावमध्ये झालेला सत्कार अविस्मरणीय – विशाल परब यांचे भावोद्गार
मे महिन्यात कुडाळात मराठा समाजाचा भव्य दिव्य मेळावा होणार
कुडाळ : हिंद मराठा संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माणगाव मध्ये माझा पहिला सत्कार होतोय. हा सत्कार मी कधीही विसरू शकणार नाही. निश्चितच माझ्या कार्याची दखल घेवून हे महत्वाचे पद मला मिळाल्यानंतर माझ्या माणगाव मध्ये माझा पहिला हृदय सत्कार मराठा बांधवांच्या वतीने होत आहे. हा सत्कार मी जीवनात कधीही विसरू शकणार नाही, असे भावनिक उदगार उद्योजक विशाल परब यांनी काढले.
हिंद मराठा( रजिस्टर) संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विशाल परब यांचा भव्य सत्कार माणगाव येथे करण्यात आला. यावेळी सत्कार समारंभात व्यासपीठावरून ते बोलत होते.यावेळी विशाल परब म्हणाले, मी अनेक वर्षे समाज कार्यात अग्रेसर आहे. माझ्या कार्याची दखल घेवून मला हे पद दिल गेलं आहे. त्याला मी योग्य पद्धतीने न्याय देणार आहे. लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर करणार आहे. तर आठही तालुक्यांचा दौरा करून या आठही तालुक्यातील अध्यक्ष निवडून तालुकास्तरीय कार्यकारणी जाहीर करणार आहे. मराठा समाजाचा जिल्ह्यास्तरीय भव्य दिव्य असा मेळावा मे महिन्याच्या तिसरा आठवड्यात कुडाळात घेणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील मराठा समाजाचे नेते उपस्थित राहणार आहेत. मराठा समाजातील मुलांसाठी व ज्ञाती बांधवांच्या उन्नतीसाठी आपण सतत झटत राहणार असल्याचे विशाल परब यांनी यावेळेस सांगितले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विशाल परब, माजी सभापती मोहन सावंत, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, श्रावण धुरी, उपसरपंच दत्ता कोरगावकर, आदम शहा, योगेश केरकर, दिनेश शिंदे यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.