असा असेल केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेचा सिंधुदुर्गमधील प्रवास !
कुडाळ : भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असून या दौऱ्याचा तपशील भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे.
ना. राणे यांचे २५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता खारेपाटण येथे जिल्हा भाजपच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. संध्याकाळी ४.४५ वाजता तरळे येथे स्वागत, संध्या. ५.३० वाजता वैभववाडी येथे स्वागत, संध्याकाळी ६.३० वाजता फोंडा, संध्याकाळी ७.३० वाजता कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे स्वागत, रात्री ८.४५ वाजता कणकवली एसटी स्थानक समोरील संपर्क कार्यालय येथे स्वागत, रात्री ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण, रात्री ९ वाजता कणकवली भाजप जिल्हा कार्यालय येथे भेट, दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण, सकाळी १०.३० वाजता नांदगाव येथे स्वागत, सकाळी ११ वाजता देवगड शिरगाव येथे स्वागत, दुपारी १२ वाजता तळेबाजार येथे स्वागत, दुपारी १२.३० वाजता जामसंडे, देवगड येथे स्वागत दुपारी १.३० वाजता कुणकेश्वर येथे स्वागत, दुपारी ३.१५ वाजता मालवण येथे स्वागत, संध्याकाळी ४.१५ वाजता मालवण भरड नाका येथे स्वागत, मालवण संध्याकाळी ५ वाजता मालवण चौके येथे स्वागत, संध्याकाळी ५.३० वाजता मालवण कट्टा येथे स्वागत, संध्याकाळी ६.३० वाजता ओरोस तिठा येथे स्वागत, संध्याकाळी ७ वाजता कुडाळ येथे स्वागत, संध्याकाळी ७.४५ वाजता कोलगाव येथे स्वागत, रात्री ८.१५ वाजता सावंतवाडी शहर मध्ये स्वागत होणार आहे. दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता वागदे गोपुरी आश्रम येथील आप्पासाहेब पटवर्धन पुतळ्यास पुष्पहार अर्पण, सकाळी १०.४० वाजता कुडाळ एमआयडीसी येथील कॉनबॅक संस्थेला भेट, दुपारी १२ वाजता बांदा येथे स्वागत, दुपारी २.३० वाजता एमआयडीसी आडाळी येथे भेट, दुपारी ३.३० वाजता दोडामार्ग येथील गांधी चौक येथे स्वागत, संध्या. ४.३० वाजता सातार्डा येथे स्वागत, दुपारी ५ वाजता मळेवाड येथे स्वागत, संध्याकाळी ५.४५ वाजता शिरोडा येथे स्वागत, संध्याकाळी ६.३० वाजता वेंगुर्ला येथे स्वागत होणार आहे.