जांभवडे गावचे मानकरी चिंतामणी मडव व गजानन जांभवडेकर यांनी हाती घेतली मशाल
कुडाळ : जांभवडे गावचे मानकरी आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते चिंतामणी मडव व गजानन जांभवडेकर यांनी मंगळवारी आमदार वैभव नाईक व उपनेते गौरीशंकर खोत यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत मशाल हाती घेतली. यावेळी पक्षाची शाल घालून व शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख महेश सावंत, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, आबा मुंज जांभवडे शाखाप्रमुख तेजस भोगले, घोटगे शाखाप्रमुख चंदन ढवळ, आंब्रड युवासेना विभागप्रमुख भावेश परब, हर्षद ढवळ, सुधीर भोसले आदी उपस्थित होते.