वैभव नाईकांच्या आमदार फंडातून राजकोटमध्ये हायमास्ट टॉवर
माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांचा पाठपुरावा ; स्थानिकांनी मानले आभार
मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दौऱ्यावेळी राजकोट मधील विद्युत पोल काढल्यामुळे याठिकाणी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे गणपती विर्सजन, होळी सण, तसेच तेथील मच्छीमार, नागरीक, पर्यट कांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे राजकोट जोशी तिठा येथे टायमस्ट उभा करण्यासाठी येथील नागरिकांनी माजी उपनगराध्य महेश जावकर यांचे लक्ष वेधले होते. त्यांच्या यशस्वी पाठपुराव्याने आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदार फंडातून येथे मिनी हायमास्ट मंजूर केला आहे.
याचे भूमीपूजन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक बाबल कवटकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, बंड्या सरमळकर, संतोष खांदारे, राजू जोशी, केतन जोशी, सेलेस्टीन फर्नाडीस, गुरुनाथ जोशी, बाबल नरोन्हा, जपा नरोन्हा, मारुती भाबल, संदीप गावकर, आशु फर्नाडीस, प्रसाद आडवणकर, उमेश मांजरेकर, कौशिक जोशी, अक्षय भोसले, बाबा माडये, चिंदरकर उपस्थित होते.