भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून पेंडूर गावात विकास गंगा ; विविध विकास कामांसाठी ३० लाखांचा निधी
निलेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन ; विकासकामांना निधी कमी पडू न देण्याची ग्वाही
पेंडूर वेताळ मंदिर येथे भक्त निवास बांधण्यासाठी २४.९० लाख तर गुरामवाड पेंडूर मोगरणे रस्ता खडीकरण, डांबरीकरण कामासाठी ५ लाखाचा निधी
मालवण : खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून मालवण तालुक्यातील पेंडूर गावातील विविध विकास कामांसाठी सुमारे ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामांची भूमिपूजन निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
पेंडूर येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या पेंडुर वेताळ मंदिर येथे भक्तनिवास बांधण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २४ लाख ९० हजारांचा निधी तसेच गुरामवाड पेंडूर मोगरणे रस्ता खडीकरण, डांबरीकरण पाच लाख असा सुमारे 30 लाख निधी निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून मंजूर करण्यात आला होता. भक्त निवास इमारत बांधकामाचा तसेच रस्ता कामाचा भूमिपूजनसोहळा भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. गावातील विकास कामांसाठी तसेच रस्ते खडीकरण डांबरीकरण कामासाठी शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यास कटीबद्ध असून विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही निलेश राणे यांनी ग्रामस्थांना दिली. दरम्यान गावातील विकासकामे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने निलेश राणे यांचे आभार मानत सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा पेंडूर जिल्हापरिषद मतदारसंघ प्रभारी सतीश वाईरकर, सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, श्री देव वेताळ देवस्थान ट्रस्ट सचिव अमित कुलकर्णी, मामा माडये, आप्पा सावंत, पटेल, संतोष साटविलकर, राजन माणगावकर, दीपा सावंत, दाजी सावंत, अश्विनी पेडणेकर, शेखर फोंडेकर, साबाजी सावंत, सतीश पाटील, बिपिन परब, शामकांत आवळेगावकर, दिलीप परब, संदेश नाईक, उत्तम गावकर, प्रमोद सावंत, गजानन सावंत, बंड्या माडये, अमित सावंत, सुरेंद्र जबडे, पिंटू वालावलकर, बाळा गावडे, बाबली गावडे, विपुल माळगावकर, नीरज गुराम, स्वप्नील सावंत, न्हानु पेंडूरकर तसेच इतर ग्रामस्थ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.