आ. वैभव नाईक यांच्या आमदार निधीतून मेढा येथे मिनी हायमास्ट टॉवर
माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांचा पाठपुरावा ; स्थानिक नागरिकांनी मानले आभार
मालवण : शहरातील मेढा भागात नागरिकांच्या मागणीनुसार आमदार वैभव नाईक यांनी अंजली लॉज नजिक मिनी हायमास्ट टॉवरसाठी आमदार निधीतून ५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या कामासाठी माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी पाठपुरावा केला. याबद्दल येथील स्थानिक नागरिकांनी आ. नाईक यांचे आभार मानले आहेत.या हायमास्ट टॉवरचे भूमीपूजन जनार्दन पाटील यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी माजी उपनगराक्ष महेश जावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शिवसेना उबाठा शहरप्रमुख बाबी जोगी, आशिष पाटील, बंड्या सरमळकर, हेमंत पाडावे, चंदू पारकर, तेजस कांदळगावकर, भाग्यश्री लाकडे, संजय गावडे, केतन मेस्त्री, अक्षय ढोलये, महेश झाड, प्रशांत मांजरेकर, अंकूश आरोलकर, प्रसाद आडवणकर, उमेश मांजरेकर, अक्षय भोसले, बाबा माडये व नागरीक उपस्थित होते