सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या माझ्या सैनिक भावांना दीर्घायुष्य लाभो….

मालवण लायन्स क्लबच्या महिला भगिनींचे अनोखे रक्षाबंधन ; सैनिकांना बांधल्या राख्या

मालवण | कुणाल मांजरेकर

येथील लायन्स क्लबच्या महिला सदस्यांनी भारत मातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकां समवेत अनोखे रक्षाबंधन साजरे केले. लायन्सच्या सदस्या वैशाली शंकरदास, दिक्षा गावकर, पल्लवी तारी खानोलकर यांनी ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल व त्यांच्या सर्व सहकारी आर्मी ऑफिसरना प्रत्यक्ष भेटून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला. या सैनिक भावाना मिठाई वाटून ओवाळणी करण्यात आली.

देशाची रक्षा करणाऱ्या भावांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष विश्वास गावकर, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट एम. आर. खोत व त्यांची पत्नी सौ. संजीवनी खोत उपस्थित होते. स्वतःच्या भावाला राखी बांधली पाहिजे, कारण तो बहिणीचे रक्षण करतो आणि बहिणीचे रक्षण करावं अशी अपेक्षा असते. मात्र जी माझी भारतमाता आहे, या बहिणीचे रक्षण करणाऱ्या सैनिकाला राखी बांधणे आणि त्याच्यासाठी देवाकडे आशीर्वाद मागणे आहे की माझ्या या भावांचं रक्षण कर असे म्हणणाऱ्या या लायन्स क्लबच्या भगिनी यांचे कौतुक होत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!