वायरी भूतनाथमध्ये अतिवृष्टीमुळे घराची पडझड ; सुदैवाने अपंग मुलगी बचावली…
घराचे सुमारे ३५ हजाराचे नुकसान
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवणमध्ये गेले चार दिवस मुसळधार पाऊस सुरु असून वायरी भूतनाथ येथील कृष्णा शांताराम गोसावी यांच्या घराची अतिवृष्टीमुळे पडझड होउन सुमारे ३५,२०० रुपयांचे नुकसान झाले आहे. विद्युत प्रवाह चालू असताना ही दुर्घटना घडली. यावेळी त्यांच्या घरात अपंग मुलगी अंथरुणात होती. मात्र सुदैवाने तिला दुखापत झाली नाही.
या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तलाठी श्री. राठोड यांनी भेट देऊन पंचयादी तयार केली. यावेळी छोटू सावजी, भाई मांजरेकर, अमित गोसावी, प्रविण सरकारे, मंदार लुडबे, भाई ढोके उपस्थित होते. वायरमन श्री. चेंदवणकर यांनी तात्काळ वीज खंडीत करुन सहकार्य केले.